काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलिस शहीद

By Admin | Updated: April 6, 2015 15:26 IST2015-04-06T15:14:17+5:302015-04-06T15:26:43+5:30

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिस शहीद झाले आहेत.

Three police martyrs in terror attack in Kashmir | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलिस शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलिस शहीद

>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ६ - जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिस शहीद झाले आहेत. सोमवारी आशिपोरा गावात झालेल्या या हल्ल्यात एक हेड कॉन्स्टेबल व दोन कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ल्यात शहीद झालेले तीनही पोलिस गुन्ह्याच्या तपासासाठी गावात गेले होते, मात्र त्यावेळी त्यांच्याकडे शस्त्रं नव्हती, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 
गेल्या तासाभरात पोलिसांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.यापूर्वी सकाळी बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण भागात एका पोलिस अधिका-यावर हल्ला करण्यात आला होता. 
 

Web Title: Three police martyrs in terror attack in Kashmir