शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शेतकऱ्यांनी केले लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:43 IST

Coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी केले लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघनसिंधू सीमेच्या दिशेने जात असल्याची माहितीपोलिसांकडून तीन जणांना अटक

नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या ६ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी अजूनही अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, दिल्लीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (three persons were arrested for violating lockdown norms near vayu bhawan delhi)

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वायुसेना भवन जवळ दिल्ली पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन शेतकऱ्यांना अटक केली. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून तिघेही ओपन जिप्सीमध्ये जात होते. चौकशीनंतर लॉकडाऊनच्या उल्लंघनाच्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतक शेतकऱ्यांना जामीनावर सोडण्यात आले.

सिंधू सीमेच्या दिशेने जात असल्याची माहिती

शेतकरी बंगला साहिब गुरुद्वारा येथे थांबले होते. त्यानंतर ते वायुसेनेच्या इमारतीजवळून जात होते. ते सिंधू सीमेच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेथे मागील सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना अडवून विविध कलमांतर्गत अटक केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा! ९७ टक्के कुटुंबांची कमाई घटली; १ कोटी रोजगार गेले

गेले दोन दिवस तिथेच थांबले होते

अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, मध्य दिल्लीतील बांगला साहिब गुरुद्वारा येथे प्रार्थना करण्यासाठी आले होते आणि गेले दोन दिवस तिथेच थांबले होते. आम्ही सिंधू सीमेच्या दिशेने जात होतो. परंतु, कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी ते जात नव्हते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, वायुसेना भवन जवळील मार्गाने प्रवेश करणे हे एक मोठे दुर्लक्ष आहे. कारण संसद भवन वायुसेना भवनाच्या अगदी जवळ आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकरी येथे पोहोचणे ही मोठी चूक मानली जाते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई केल्याचे समजते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPoliceपोलिसFarmerशेतकरी