सहारनपूर दंगलीत 3 जण ठार

By Admin | Updated: July 26, 2014 23:45 IST2014-07-26T23:45:26+5:302014-07-26T23:45:26+5:30

प्रशासन चालविण्यात जनतेचे मत जाणून घेण्याच्या जमिनीशी निगडित वादातून उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे आज शनिवारी दोन समाजात भडकलेल्या दंगलीत 3 ठार तर 22 जण जखमी झाल़े

Three people killed in Saharanpur riots | सहारनपूर दंगलीत 3 जण ठार

सहारनपूर दंगलीत 3 जण ठार

>लखनौ/सहारनपूर : जमिनीशी निगडित वादातून उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे आज शनिवारी दोन समाजात भडकलेल्या दंगलीत 3 ठार तर 22 जण जखमी झाल़े जखमींमध्ये सिटी मॅजिस्ट्रेट आणि पाच पोलिसांचा समावेश आह़े तणावाची स्थिती बघता अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आह़े
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वरिष्ठ अधिका:यांना हिंसाचार  कठोरपणो हाताळण्याचे आदेश दिले आहेत़ कुतुबशेर भागातील एका वादग्रस्त जमिनीवर एका समाजाने आज पहाटे बांधकाम सुरू केल़े याची माहिती मिळताच दुस:या समाजाचे लोक तिथे पोहोचले आणि वादाची ठिणगी पडली़ थोडय़ाच वेळात या वादाने हिंसाचाराचे रूप घेतल़े दोन्ही बाजूंनी दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबार होऊन यात एका व्यापा:यासह तिघांचा मृत्यू झाला़  तर 22 जण जखमी झालेत़ हिंसाचारादरम्यान एका पोलीस कर्मचा:यास गोळी लागली़ त्याची स्थिती गंभीर आह़े उग्र जमावाने अनेक दुकानांना आगी लावल्या़ काही पेट्रोल पंप तसेच बस स्थानकारवर उभ्या असलेल्या तीन बसगाडय़ांनाही पेटवून दिल़े आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दल तसेच पोलिसांवरही तुफान दगडफेक केली़ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर रबराच्या गोळ्या झाडून अश्रूधूराचे नळकांडे फोडल़े शीघ्र कृती दल तसेच लष्करालाही पाचारण करण्यात आल़े पाच पोलीस ठाण्यांतर्गत क्षेत्रत संचारबंदी लागू केली. (वृत्तसंस्था)
 
4केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत राज्यात शांतता व स्थिती नियंत्रणासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही    दिली़ 
 
 
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ यांनी  सहारनपूरमधील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली़ हिंसाचारग्रस्त भागात तत्काळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिल़े
 
4उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील दंगलीच्या पाश्र्वभूमीवर देशात ‘विद्वेषाचे राजकारण’ बंद करा, असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आह़े तर काँग्रेसने यानिमित्ताने भाजपावर ‘पूर्वनियोजितरीत्या सांप्रदायिक ध्रुवीकरण ’ करण्याचा आरोप केला आह़े राहुल यांनी शनिवारी एक निवेदन जारी करून विद्वेषाचे राजकारण थांबले पाहिज़े सर्व जनतेला शांतता बाळगण्याचे आवाहन केले आह़े 
 
 

Web Title: Three people killed in Saharanpur riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.