शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 05:36 IST

पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी वापरली तशीच शस्त्रे श्रीनगरनजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती.

श्रीनगर: २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार व त्याच्या दोन साथीदारांचा लष्कराच्या विशेष पॅरा कमांडोंनी सोमवारी एका चकमकीत खात्मा केला. या कारवाईला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले होते. 

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरनजीकच्या असलेल्या हरवनच्या जंगल परिसरात ही घटना घडली. गेल्या वर्षी सोनमर्ग बोगदा प्रकल्पावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचाही मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

सॅटेलाइट फोनमुळे हल्लेखोरांचा लागला छडा

काश्मीर विभागाचे पोलिस महानिरीक्षक व्ही. के. बर्डी यांनी सांगितले की, हरवनच्या जंगलात लष्करी जवान व दहशतवाद्यांमध्ये काही तास सोमवारी चकमक सुरू होती. या परिसरात सॅटेलाइट फोनचा वापर काही जणांकडून होत असल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांनी त्याठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. हाच फोन पहलगाम हल्ला करताना दहशतवाद्यांनी वापरला. त्या फोनवर ठेवलेल्या पाळतीमुळेच हल्लेखोरांचा गुप्तहेर यंत्रणांना छडा लावता आला.  

जिब्रान, हमजा अफगाणी देखील मारले गेले

पहलगाम हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार सुलेमान ऊर्फ आसिफ ठार झाला असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा कयास आहे, तर त्याचे दोन साथीदार जिब्रान व हमजा अफगाणी हेदेखील या चकमकीत मारले गेले आहेत. पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी वापरली तशीच शस्त्रे श्रीनगरनजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी