शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
4
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
5
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
6
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
7
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
8
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
9
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
10
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
11
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
12
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
13
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
14
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
16
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
17
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
18
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
19
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
20
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?

कर्नाटकात रस्ते अपघातात तीन लहानग्यांसमवेत नऊ लोकांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:49 IST

 कर्नाटक पुन्हा एकदा भीषण अपघातानं हादरलं आहे. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन लहानग्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही वाहनांचा अपघात एवढा जबरदस्त होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे.

बंगळुरू, दि. 13-  कर्नाटक पुन्हा एकदा भीषण अपघातानं हादरलं आहे. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन लहानग्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही वाहनांचा अपघात एवढा जबरदस्त होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे. कारवार तालुक्याजवळ झायलो गाडी आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातस्थळी पोलीस दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. झायलो गाडीतून माणसे येल्लापूरहून अनकोला जिल्ह्यात जात होते. त्याच वेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला गंभीररीत्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. बागलकोटमध्ये क्रूझर गाडी आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाल्याचं समजतं आहे. या अपघातात सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. तसंच इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेले सहा जणही सोलापुरातील दारफळ येथील आहेत. कर्नाटकामध्ये औषध घेण्यासाठी सोलापुरातील 12 जण गेले होते तेव्हा हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.वैद्यकीय उपचारासाठी कर्नाटकात रुग्णाला घेऊन गेलेल्या माढा तालुक्यातील दारफळ येथील क्रूझर गाडीची बागलकोट तालुक्यातील बिळगी गावाजवळ शुक्रवारी सकाळी बसला धडक झाली. या  भीषण अपघातात दारफळसह परिसरातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथील 12 जण गुरुवारी कर्नाटकात कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णाला घेऊन गेले होते. शुक्रवारी सकाळी रुग्णासह इतर 12 प्रवाशांना घेऊन निघालेल्या या क्रूझर आणि बसमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. यात चालकासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, उर्वरित सहा जण बचावले आहेत. घटनास्थळी तात्काळ वैद्यकीय तसंच पोलिसांचं पथक दाखल झालं. पण या अपघातातील जखमींची आणि मृत्यू झालेल्यांची नावं अजून समजलेली नाहीत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

टॅग्स :Accidentअपघात