अनैतिक संबंध लपवण्यासाठी तीन हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:33 IST2018-04-27T00:33:39+5:302018-04-27T00:33:39+5:30

केरळमध्ये महिलेस अटक; मुलगी व आई-वडिलांना दिले विष

Three murders to hide immoral relations | अनैतिक संबंध लपवण्यासाठी तीन हत्या

अनैतिक संबंध लपवण्यासाठी तीन हत्या

कन्नूर : स्वत:चे परपुरुषाशी असलेले अनैतिक संबंध उघड होऊ नयेत, म्हणून एका महिलेने आपल्या ९ वर्षांच्या मुलीला तसेच वृद्ध आई-वडिलांना जेवणात उंदरांना मारण्याचे विषय घालून मारून टाकले, असे उघडकीस आले आहे. तिला १५ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कन्नूर जिल्ह्याच्या पिनराई गावातील या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली होती आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून, त्याची नीट चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
पिनराई गावात राहणाऱ्या या महिलेच्या नऊ वर्षांच्या ऐश्वर्या या मुलीचा २१ जानेवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला. त्यावेळी तिला विषबाधा झाल्याचे या महिलेने सांगितले होते. त्यावर लोकांनी विश्वासही ठेवला. पण त्यानंतर ७ मार्च रोजी तिची ६९ वर्षे वयाची आईही त्याच पद्धतीने मरण पावली. तेव्हा घरातील विहिरीच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा दावा तिने केला. तेव्हाही कोणाला शंका आली नाही.
मात्र त्यानंतर १३ एप्रिल रोजी तिचे ७६ वर्षांचे वडीलही अचानक मरण पावले. तेव्हाही तिने पाण्यातून विषबाधा हे कारण सांगितले. एवढेच नव्हे, तर मलाही पाण्याचा त्रास झाला, असे सांगून ती रुग्णालयात दाखल झाली. त्यामुळे तिच्या घराबाहेरील विहिरीच्या तसेच गावातील सर्व विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र त्या पाण्यातून विषबाधा होणे शक्यच नाही, असा अहवाल आला. त्यामुळे गावकरी व पोलीस यांचा संशय वाढला. 

मुलीने पाहिले होते
हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी बारकाईने चौकशी सुरू केली. तेव्हा या महिलेचे अनेक पुरुषांशी संबंध होते, असे लक्षात आले. तिने नवºयाशी आधीच घटस्फोट घेतला होता. तिच्या ९ वर्षांच्या ऐश्वर्याने तिला एका पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते आणि ते स्वत:च्या आजी-आजोबांना सांगितले होते. त्यामुळे तिने आधी मुलीला मारून टाकले. त्याप्रकारे मारल्याने कोणाला संशय येत नाही, हे लक्षात आल्यानंतर तिने आई-वडलांनाही मारून टाकले, असे उघड झाले आहे.

Web Title: Three murders to hide immoral relations

टॅग्स :Murderखून