काश्मीरमधील बारामुला येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 17:32 IST2019-01-23T17:31:53+5:302019-01-23T17:32:21+5:30
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे.

काश्मीरमधील बारामुला येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे. दरम्यान, आज बारामुला येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
आज दुपारी बारामुला जिल्ह्यातील बिनेर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान, शोपियानममधील हेफ श्रीमल भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.
Three terrorists killed in an encounter with security forces in Baramula #JammuAndKashmirpic.twitter.com/RWLnXdJ7fz
— ANI (@ANI) January 23, 2019