काश्मिरात तीन दहशतवादी ठार; ओळख अद्याप पटू शकलेली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:58 IST2020-12-31T00:28:36+5:302020-12-31T06:58:50+5:30
पारिम्पोरा भागामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम हाती घेतली.

काश्मिरात तीन दहशतवादी ठार; ओळख अद्याप पटू शकलेली नाही
श्रीनगर : श्रीनगर शहरातील पारिम्पोरा या भागात मंगळवारी (दि. २९) सायंकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, पारिम्पोरा भागामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात बुधवारी पहाटे एक दहशतवादी ठार झाला व त्यानंतर काही तासांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला.