कोर्टातील गैरहजेरीमुळे तीन लाख रूपयांचा दंड
By Admin | Updated: August 31, 2014 01:57 IST2014-08-31T01:57:31+5:302014-08-31T01:57:31+5:30
माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी दीक्षित यांच्याविरुद्ध हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

कोर्टातील गैरहजेरीमुळे तीन लाख रूपयांचा दंड
नवी दिल्ली : अब्रूनुकसानीच्या खटल्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने शनिवारी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी दीक्षित यांच्याविरुद्ध हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
दीक्षित यांच्यावर दंड ठोठावला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने त्यांना 5क्क्क् रुपयांचा दंड ठोठावला होता. दंडाची ही रक्कम त्यांनी गेल्या जानेवारीत भरली होती. दीक्षित यांनी दोन लाख रुपये दिल्ली राज्य विधिसेवा प्राधिकार (डीएनएसए)कडे जमा करावेत आणि एक लाख रुपये गुप्ता यांना द्यावेत, असा आदेश महानगर दंडाधिकारी नेहा यांनी दिला. पुढील सुनावणी 2क् डिसेंबरला होईल. त्यावेळी दीक्षित यांनी न्यायालयात हजर राहावे, असेही न्या. नेहा म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)