रेल्वेने तीन लाख भाविक रवाना

By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:07+5:302015-09-16T23:38:07+5:30

नाशिकरोड : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या दुसर्‍या पर्वणीच्या शाहीस्नानानंतर मंगळवारी ७५ हजारांहून अधिक भाविक रेल्वेमार्गे रवाना झाले. रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांच्या अत्यंत चोख नियोजनामुळे गेल्या तीन दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविक सुरक्षितरीत्या रवाना झाले आहेत.

Three lakh devotees leave for Railways | रेल्वेने तीन लाख भाविक रवाना

रेल्वेने तीन लाख भाविक रवाना

शिकरोड : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या दुसर्‍या पर्वणीच्या शाहीस्नानानंतर मंगळवारी ७५ हजारांहून अधिक भाविक रेल्वेमार्गे रवाना झाले. रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांच्या अत्यंत चोख नियोजनामुळे गेल्या तीन दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविक सुरक्षितरीत्या रवाना झाले आहेत.
कुंभमेळ्याच्या दुसर्‍या पर्वणीकरिता लाखो भाविक शहरात दाखल झाले होते. रविवारी सकाळी दुसर्‍या पर्वणीचे शाहीस्नान झाल्यानंतर सकाळपासूनच माघारीच्या प्रवासासाठी साधू-महंत, भाविकांची हजारोंच्या संख्येने रेल्वेस्थानकावर गर्दी झाली होती. आज मंगळवारी तिसर्‍या दिवशीदेखील परतीच्या भाविकांच्या गर्दीने रेल्वेस्थानक परिसर फुलून गेला होता.
परतीच्या भाविकांना रविवारी-सोमवारी रेल्वे मालधक्का येथून रेल्वेस्थानकावर सोडण्यात येत होते. मात्र मंगळवारी रेल्वेस्थानकांवर भाविकांना स्थानकाच्या पुढील दर्शनी बाजूने सोडण्यात येत होते. सोमवारी रात्री मोठ्या संख्येने भाविक रेल्वेने गेल्यानंतर मंगळवारी सकाळी परतीच्या भाविकांची संख्या रोडावली होती. मात्र शाहीस्नानानंतर इतरत्र देवदर्शनास गेलेले भाविक पुन्हा परतीच्या प्रवासासाठी मंगळवारी दुपारनंतर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्याने रेल्वेस्थानकावर पाय ठेवण्यासदेखील जागा राहिलेली नव्हती. तीन दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविक रेल्वेमार्गे गेल्याचा दावा रेल्वे सुरक्षा दलाने केला आहे.
दुसर्‍या पर्वणीला आलेल्या व जाणार्‍या शेकडो भाविकांची ताटातूट झाल्यानंतर रेल्वेस्थानकावरील राहुल साऊंड ट्रॅकचे उद्घोषणा केंद्र भाविकांचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. ताटातूट झालेले शेकडो नातेवाईक उद्घोषणा केंद्रातील होणारे आवाहन व दिली जाणारी माहिती यामुळे अनेक हरविलेल्यांची आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली. उद्घोषणा केंद्रातील पी. ए. सिस्टीम व डिस्प्ले इंडिकेटर यंत्रणा भाविकांच्या दृष्टीने अत्यंत मदतीची ठरली. राहुल साऊंड ट्रॅकचे सुभाष पोळ व उद्घोषक प्रदीप अहिरे, महेंद्र परदेशी, विकी कदम, विनोद जाधव आदिंची रेल्वे प्रशासन, पोलीस व भाविकांना झालेली मदत लाख मोलाची ठरली. (प्रतिनिधी)

फोटो- आर फोटोला १५ रेल्वे नावाने सेव्ह आहे.
(फोटो कॅप्शन : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उद्घोषणेद्वारे सूचना देताना पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर, चंद्रकांत भाबल आदि.

--इन्फो--
५० लाखांची उत्पन्न
दुसर्‍या पर्वणीनंतर सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ४५ हजार परतीच्या भाविकांनी तिकीट काढल्याने रेल्वे प्रशासनाला ५० लाखांची कमाई झाली आहे. रविवारी पर्वणीच्या दिवशी परतीच्या भाविकांमुळे ७० लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

Web Title: Three lakh devotees leave for Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.