ओदिशामध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात ३ जवान शहीद
By Admin | Updated: August 26, 2015 11:23 IST2015-08-26T11:10:44+5:302015-08-26T11:23:44+5:30
ओदिशातील मलकनगरी जिल्ह्यात बुधवारी सकाळी माओवाद्यांनी बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) ताफ्यावर केलेल्या तीन जवान शहीद झाले.

ओदिशामध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात ३ जवान शहीद
style="font-family: Mangal, Verdana; line-height: 25px;">ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. २६ - ओदिशातील मलकनगरी जिल्ह्यात बुधवारी सकाळी माओवाद्यांनी बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) ताफ्यावर केलेल्या तीन जवान शहीद झाले असून सहा जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यास लागून असलेल्या ओदिशातील मलकनगरी जिल्ह्यातील चित्रकोंडा भागात हा हल्ला झाला. बुधवारी सकाळी माओवाद्यांनी भूसुंरूगाचा स्फोट घडवत बीएसएफ जवानांना लक्ष्य केले. त्यात ३ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर अतिरिक्त दल घटनास्थळी पाठवण्यात आले असून हल्ल्यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.