शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 21:08 IST

जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर एक जवान जखमी झाला आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर एक जवान जखमी झाला आहे. माछिल सेक्टरमधल्या लष्करी तळावर अचानक बर्फाच्छादित डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत तीन जवानांना प्राण गमावावे लागले आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाड्यामधीलच तंगधारमध्ये हिमस्खलनात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये काही पर्यटकांचा समावेश होता. पर्यटकांची गाडी कुपवाड्याहून करनाह येथे येत असताना ही दुर्घटना घडली होती. हिमस्खलनात पर्यटकांची गाडी बर्फाखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले होते.तंगधारच्या साधना टॉपजवळ ही घटना घडली होती. दोन जणांचे मृतदेह हाती लागले होते. त्यात 10 वर्षांच्या मुलाचा समावेश होता. ज्या कुपवाडा-करनाह मार्गावर ही दुर्घटना घडली तो मार्ग बर्फवृष्टीमुळे हिवाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये बंद असतो. सुलेमान (10) आणि टॅक्सी चालक झहून अहमद या दोघांचे मृतदेह काल सापडले होते.रात्रीच्या वेळी मदतकार्य थांबवण्यात आले होते. दुर्घटना अत्यंत दुर्गम भागात घडल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असून, बर्फवृष्टीही सुरू आहे. हिवाळ्यात काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडत असतात. भारताने आपल्या अनेक जवानांना हिमस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये गमावले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर