शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

नक्षलवाद्यांशी चकमकीत सीआरपीएफचे तिघे शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 04:55 IST

नक्षलवाद्यांसोबत शुक्रवारी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले व एक मुलगी ठार झाली.

बिजापूर (छत्तीसगड) -  नक्षलवाद्यांसोबत शुक्रवारी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले व एक मुलगी ठार झाली. सीआरपीएफची १९९ वी बटालियन आणि राज्याचे पोलीस मोटारसायकलवर त्या भागात गस्त घालत असताना केशकुतुल (जिल्हा बिजापूर) खेड्याजवळ नाल्यापाशी सकाळी ११ च्या सुमारास ही चकमक झाली, असे बिजापूरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी सांगितले. या चकमकीत दोन मुलीही सापडल्या, त्यात एक मरण पावली, तर दुसरी जखमी झाली.मोटारसायकवर ही गस्त घालणारी तुकडी केशकुतुल येथील छावणीपासून भैरामगडकडे निघाली होती.केशकुतुलमधून ही तुकडी जात असताना सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू करताच चकमक सुरू झाली, असे पटेल म्हणाले. सीआरपीएफचे दोन जण जागीच ठार झाले, तर तिसरा जखमी होऊन मरण पावला.दोन सहायक उपनिरीक्षक महादेव पी. (५०, कर्नाटक), मदन पाल सिंह (५२, उत्तर प्रदेश) आणि हेड कॉन्स्टेबल साजू ओ. पी. (४७, केरळ) यांचा चकमकीत मृत्यू झाला. दोन अल्पवयीन मुली मालवाहतुकीच्या वाहनातून चकमकीच्या ठिकाणाहून जात असताना तीत सापडल्या. त्यात एक मरण पावली, तर दुसरी जखमी झाली, असे पटेल म्हणाले. घटनास्थळी कुमक पाठवण्यात आली आहे.घटनास्थळी झडती घेतली असता दोन दूर नियंत्रक स्फोटक उपकरणे हाती लागली. दुसऱ्या एका पोलीस अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी एके-४७ रायफल व तिच्या चार मॅगझिन्स, एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि सुरक्षादलांचे एक बिनतारी संदेश यंत्र लुटून नेले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी