बलात्कारानंतर सीआरपीएफचे तीन जवान निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:18 IST2018-04-30T02:18:46+5:302018-04-30T02:18:46+5:30

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या येथील छावणीत मला डांबून ठेवून त्यांच्यापैकी एकाने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने (२४) केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.

Three CRPF jawans suspended after rape | बलात्कारानंतर सीआरपीएफचे तीन जवान निलंबित

बलात्कारानंतर सीआरपीएफचे तीन जवान निलंबित

जम्मू : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या येथील छावणीत मला डांबून ठेवून त्यांच्यापैकी एकाने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने (२४) केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.
ही महिला पूंछ जिल्ह्यातील मंडी येथील असून तिने शनिवारी डोमाना येथील पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. सीआरपीएफच्या तीन जवानांनी दहा मार्च रोजी मला मध्येच थांबवून त्यांच्या छावणीत नेले व त्यांच्यापैकी एकाने बलात्कार केला, असे तक्रारीत तिने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. अत्याचाराचे चित्रीकरण करून अत्याचाराचा प्रकार पोलिसांना किंवा इतर कोणाला सांगितल्यास समाजमाध्यमांवर व्हिडिओ टाकण्याची धमकीही दिली, असा आरोपही तिने केला. मी रात्री साडेसातच्या सुमारास बसमधून उतरून माझ्या नातेवाईकाच्या घरी निघाले होते. मी रस्ता चुकले व अर्ध्या तासानंतर सीआरपीएफच्या गणवेशातील तीन कर्मचाºयांनी मला त्यांच्या छावणीच्या बाहेर हटकले. मला त्यांनी मदतीच्या हेतूने छावणीच्या आत नेले व त्यांच्यापैकी एकाने माझ्यावर बलात्कार केला.

Web Title: Three CRPF jawans suspended after rape