चंद्रज्योतीच्या बीया खाल्याने तीन बालकांना विषबाधा
By Admin | Updated: January 26, 2016 00:04 IST2016-01-26T00:04:53+5:302016-01-26T00:04:53+5:30

चंद्रज्योतीच्या बीया खाल्याने तीन बालकांना विषबाधा
>जळगाव : चंद्रज्योतीच्या बीया खल्ल्याने अंबाडी ता.जामनेर येथील तीन बालकांना विषबाधा झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली. बालकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.गावाजवळील धरणाच्या पाटाजवळ जाबीर तकदीर तडवी (७), समीना सुपडू तडवी (६) व मीना सुपडू तडवी (४) या बालकांनी चंद्रजोतीच्या बीया खाल्ल्याने विषबाधा झाली. सुरुवातीला जाबीरला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी रवाना करण्यात आले. काही वेळात समीना व मीना या दोघं बहिणींची तब्बेत खराब झाल्याने त्यांना तत्काळ शेंदुर्णी येथे उपचार करून दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.