मालेगाव परिसरात अवकाळी पाऊस, वादळी वार्यामुळे तीन जनावरे ठार
By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST
वीज पडल्याने शेतकरी गंभीर, केळी, हळद, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान
मालेगाव परिसरात अवकाळी पाऊस, वादळी वार्यामुळे तीन जनावरे ठार
वीज पडल्याने शेतकरी गंभीर, केळी, हळद, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसानमालेगाव : गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे मालेगाव व परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले़ तर विजेची तार अंगावर पडल्यामुळे एक बैल मृत्यूमुखी तर वीज कोसळल्याने एक बैल, शेळी होरपळून मृत्युमुखी झाली़ विजेची आस लागल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला़ मालेगाव परिसरात ९ रोजी रात्री अचानक अवकाळी पाऊस व वादळी वारे सुरू झाले़ सद्यस्थितीत हळदीची काढणी सुरू असून यामुळे वाळ्यात टाकलेल्या हळदीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ तर केळी आडव्या झाल्या आहेत़ शिवाजी माधवराव इंगोले यांच्या शेतात विद्युत तार बैलाच्या अंगावर पडल्याने बैल जागीच ठार झाला़ तर वीज कोसळल्याने गंगाप्रसाद किसन इंगोले यांचा बैल व संदीप मारोतराव तिम्मेवार यांची शेळी होरपळून मृत्यूमुखी पडली़ दरम्यान, विजेची आस लागल्याने संदीप तिम्मेवार हा शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत़ मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़वारडकर यांनी पंचनामा करून पाहणी केली़ अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे मालेगाव परिसरातील सद्यस्थितीतील केळी, हळद, ज्वारी, आंबा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे़