रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली; पोलिसांना बोलावताच लज्जास्पद प्रकार समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:03 IST2021-05-16T13:01:15+5:302021-05-16T13:03:45+5:30
रुग्णवाहिकेत असलेल्या चौघांना अटक; पोलिसांनी रुग्णवाहिका केली जप्त

रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली; पोलिसांना बोलावताच लज्जास्पद प्रकार समोर
वाराणसी: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अनेक राज्यांमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील वाराणसीत एक अतिशय लज्जास्पद प्रकार घडला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून रुग्णवाहिकादेखील जप्त करण्यात आली आहे.
कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?
सुजाबादी चौकी परिसरात फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी काहींना एक रुग्णवाहिका उभी असलेली दिसली. ही रुग्णवाहिका हलत असल्यानं काहींना संशय आला. त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना रुग्णवाहिकेत चार व्यक्ती आढळून आल्या. तीन तरुण आणि एक तरुणी रुग्णवाहिकेत अश्लिल चाळे करत असल्याचं पोलिसांनी पाहिलं. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका जप्त करत चारही जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
फारशी ये-जा नसलेल्या रस्त्यावर उभी असलेली रुग्णवाहिका हलत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हा लज्जास्पद प्रकार समोर आला. रुग्णवाहिकेत अश्लिल चाळे करणाऱ्या चौघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेली रुग्णवाहिका गंगा सेवा सदन नावाच्या एका खासगी रग्णालयाची आहे. रुग्णवाहिका अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला चालवण्यासाठी देण्यात आली होती.