‘गोली मारो’ घोषणा देणाऱ्या भाजपच्या तीन समर्थकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:22 IST2020-03-03T06:22:18+5:302020-03-03T06:22:27+5:30
‘देश के गद्दारों को, गोली मारो...’ अशा घोषणा देणा-या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कोलकाता पोलिसांनी दिली.

‘गोली मारो’ घोषणा देणाऱ्या भाजपच्या तीन समर्थकांना अटक
कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीमध्ये जाताना कथितरीत्या ‘देश के गद्दारों को, गोली मारो...’ अशा घोषणा देणा-या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कोलकाता पोलिसांनी दिली. एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, भाजपच्या समर्थकांनी चिथावणीखोर घोषणा दिल्या. या आरोपींनी शहीद मीनार मैदानात जाताना एस्प्लेनेड मार्गावर बाजारपेठेत घोषणाबाजी केली. एका व्यक्तीने रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे ध्रुव बसू, पंकज प्रसाद आणि सुरेंद्र कुमार या तिघांना अटक करण्यात आली. यावर संताप व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, ही दिल्ली नाही. ‘गोली मारो’च्या घोषणा येथे सहन केल्या जाणार नाहीत.