शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील १४ मान्यवरांना पद्म सन्मान; तिघांना पद्मभूषण, ११ जणांना पद्मश्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 05:46 IST

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर या तीन मान्यवरांसह १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार तर मारूती चितमपल्ली, विलास डांगरे, चैतराम पवार यांच्यासह देशभरातील ३० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यात गोव्याच्या लिबिया लोबो सरदेसाई यांचाही समावेश आहे.

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हा पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात.

केंद्र सरकारने शनिवारी कला, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, मेडिकल, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील ३० जणांच्या नावाची घोषणा पद्मश्री विजेते म्हणून केली आहे.

नागपूरचे पक्षीतज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण, डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय आणि चैत्राम देवचंद पवार यांना पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे ९२ वर्षांचे मारूती चितमपल्ली यांची वन, वन्यप्राणी आणि पक्षीशास्त्रावर आधारित २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राज्यातील विविध अभयारण्यात उत्तम कार्य केले आहे. नागपूरचे होमियोपॅथी डॉक्टर विलास डांगरे हे ७० वर्षांचे असून मागील ५० वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचा अत्यल्प शुल्क आकारून उपचार करीत आहेत. नागपुरात त्यांनी एक लाखापेक्षा जास्त रूग्णांवर उपचार केले आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अविस्मरणीय भूमिकांना रुपेरी पडदा गाजवणारे ख्यातनाम कलावंत अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाला. 

टॅग्स :Governmentसरकारpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार