महिलेच्या छेडछाडप्रकरणी तिघे ताब्यात
By Admin | Updated: May 12, 2014 21:35 IST2014-05-12T21:35:03+5:302014-05-12T21:35:03+5:30

महिलेच्या छेडछाडप्रकरणी तिघे ताब्यात
>इचलकरंजी : रांगोळी (ता. हातकणंगले) येथील विवाहितेची मुलाला शाळेत सोडायला जाताना वारंवार छेड काढण्याचा प्रकार घडत होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत याबाबतची नोंद करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)