Jaipur SMS: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतववाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांना एअर स्ट्राईक करुन लक्ष्य केलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये राजधानी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून संपूर्ण एसएमएस स्टेडियम ताबडतोब रिकामे केले. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथक देखील स्टेडियमच्या प्रत्येक भागाची तपासणी करत आहेत.
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:43 IST