शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'तुरुंगात माझे जीवन नरक बनविण्याची धमकी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:43 IST

ख्रिस्तियन मिशेलचा राकेश अस्थाना यांच्यावर भर कोर्टात आरोप

नवी दिल्ली : सीबीआयचे माजी विशेष महासंचालक राकेश अस्थाना हे मला दुबईत भेटले होते. आम्ही सांगू तसे न केल्यास तुरुंगात तुझे जीवन नरक बनविले जाईल, अशी धमकीही अस्थाना यांनी दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट आगुस्ता वेस्टलॅण्ड घोटाळ्यातील आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने भर कोर्टात केला. तिहार तुरुंगात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मिशेलची बुधवारी किंवा गुरुवारी चौकशी करण्याची मुभा विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी दिली. त्यांच्या समक्ष मिशेल उपरोक्त गौप्यस्फोट केला. राकेश अस्थाना मला दुबईत भेटले असता त्यांनी मला उपरोक्त धमकी दिली. आज तसेच घडतेय. तुरुंगात माझ्या शेजारच्या कोठडीत छोटा राजन आहे. मला दहशतवादी आणि अनेक लोकांना ठार मारणाऱ्या गुन्हेगारांसोबत डांबले जात आहे. असा मी कोणता गुन्हा केला, हेच मला ठाऊक नाही. मला तुरुंगात १६ ते १७ काश्मिरी दहशतवाद्यांसोबत डांबले; परंतु तुरुंग प्रशासनाने माझ्या जिवाला असलेल्या धोक्याचा विचार करून मला सुरक्षित कोठडीत हलविण्यात आले, असे मिशेलने कोर्टात सांगितले. तुरुंगात मिशेलची सकाळी आणि सायंकाळी अर्धा तास चौकशी करतेवेळी तुरुंग अधिकारी हजर असतील, तसेच मिशेलच्या वकिलालाही काही मर्यादित वेळेसाठी सोबत राहता येईल, असे कोर्टाने सांगितले.तुरुंगात मानसिक छळ होत असल्याचा आरोपतुरुंगात मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मिशेल याने केला. त्याची दखल घेऊन कोर्टाने ज्या आधारावर त्याला सुरक्षित कोठडीत हलविण्यात आले, त्यासंबंधीचे सीसीटीटीव्ही फुटेज आणि अहवाल गुरुवारपर्यंत सादर करण्याचे तुरुंग प्रशासनाला निर्देश दिले. दुबईतून प्रत्यार्पण केल्यानंतर ईडीने मागच्या वर्षी २२ डिसेंबर रोजी मिशेलला अटक केली होती.