२२ हजारांचा गुटख्याचा साठा जप्त एक ताब्यात : दादावाडी जैन मंदिरासमोर तालुका पोलिसांची कारवाई

By Admin | Updated: August 5, 2016 22:25 IST2016-08-05T22:25:48+5:302016-08-05T22:25:48+5:30

जळगाव : चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून २२ हजार ७५० रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन जाणारा शकील बाबुलाल पटेल (वय ३०, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) यास तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता दादावाडी जैन मंदिरासमोर पकडले.

Thousands of gutka seized in possession of 22 thousand: Taluka police action in front of Dadawadi Jain temple | २२ हजारांचा गुटख्याचा साठा जप्त एक ताब्यात : दादावाडी जैन मंदिरासमोर तालुका पोलिसांची कारवाई

२२ हजारांचा गुटख्याचा साठा जप्त एक ताब्यात : दादावाडी जैन मंदिरासमोर तालुका पोलिसांची कारवाई

गाव : चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून २२ हजार ७५० रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन जाणारा शकील बाबुलाल पटेल (वय ३०, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) यास तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता दादावाडी जैन मंदिरासमोर पकडले.
राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखूला बंदी असतानाही शकील पटेल हा त्याच्या (एमएच १९ एक्स ७६८८) क्रमांकाच्या दुचाकीवरून गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा घेऊन जात होता. त्याला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आवारी, एस.एस. सुदर्शन, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र बोरसे, पोलीस नाईक जितेंद्र पाटील व रवींद्र परदेशी यांनी सापळा लावून पकडले. त्याला ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांना पत्र देऊन याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Thousands of gutka seized in possession of 22 thousand: Taluka police action in front of Dadawadi Jain temple