शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना पक्षात काही जबाबदारीच घ्यायची नाही, त्यांनी निवृत्त व्हावे : खरगे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:26 IST

आता उमेदवार निवडीत जिल्हा अध्यक्षांच्या शब्दाला महत्त्व.

अहमदाबाद : ज्यांनी पक्षकार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही, अशा नेत्यांनी आराम करावा आणि ज्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही, त्यांनी निवृत्तीच स्वीकारावी, असा कडक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या नेत्यांना बुधवारी दिला. काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले. काँग्रेस देशातील ऐक्य कायम ठेवण्यासाठी झटते तर भाजप समाजात फूट पाडत आहे, असेही ते म्हणाले.

येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठकीच्या अखेरच्या दिवशी खरगे म्हणाले की, पक्ष संघटनेत यापुढे जिल्हा अध्यक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्तीत पक्षपात होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणुकीत उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत त्यांच्याच शब्दाला महत्त्व असेल. जिल्हा अध्यक्षांना त्यांची नियुक्ती झाल्यापासून एक वर्षाच्या आत बूथ कमिटी, मंडळ कमिटी, ब्लॉक कमिटी व जिल्हा कमिटीत चांगल्या लोकांना सामावून घेत तयार कराव्या लागतील. या नेमणुकांत कोणताही पक्षपात होऊ नये, ही त्यांची जबाबदारी असेल.

महाराष्ट्रात फसवणुकीने विजय मिळविल्याचा आरोपमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत भाजपने फसवणूक करून विजय मिळविल्याचा आरोप खरगे यांनी यावेळी केला. निवडणुकांत मतपत्रिकेच्या आधारेच मतदान घेतले जावे, अशीही मागणी त्यांनी केली.

संपूर्ण जग ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिकांकडे वळत आहे; पण केंद्र सरकार ईव्हीएमसाठी आग्रही आहे. आपल्याला फायदा होईल, अशा प्रकारचेच तंत्रज्ञान केंद्र सरकारने ईव्हीएमसाठी विकसित केले आहे. केंद्र सरकारने ११ वर्षांपासून सातत्याने राज्यघटनेवर हल्ले केले. त्यामुळे राज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेसने लढा सुरू केला आहे. संसदेत विरोधी पक्षनेत्याचे भाषणासाठी नाव पुकारले जाते; पण त्याला बोलू दिले जात नाही, असेही ते म्हणाले.

जिल्हा अध्यक्षांच्या तीन बैठकादेशभरातील जिल्हा अध्यक्षांच्या तीन बैठका घेण्यात आल्या. राहुल गांधी आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. उमेदवार निवडीत त्यांना सामील करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस