शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ घालणाऱ्या खासदारांना उत्तर देण्याची गरज नाही; ओम बिर्लांचे सर्व मंत्र्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:34 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज तुतू-मैमै पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात दररोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुतू-मैमै पाहायला मिळत आहे. बुधवारी(दि.4)देखील लोकसभेत गदारोळ झाला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी मंत्र्यांना एक सल्ला दिला. 'ज्या सदस्यांना खुर्चीवर बसून बोलण्याची परवानगी नाही, त्यांना मंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज नाही,' असे बिर्ला म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारले जात असताना त्यांनी ही टिप्पणी केली.

विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खाली बसून काही टिपण्णी केली, ज्याच्या उत्तरात वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिले. यावर बिर्ला म्हणाले, मंत्र्यांना विनंती आहे की, ज्यांना (सदस्यांना) बोलण्याची परवानगी दिली नाही, त्यांना उत्तरे देण्याची गरज नाही.

ओम बिर्ला मंत्र्यांवर कशामुळे चिडले?संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत शून्य तास सुरू होण्यापूर्वी अजेंड्यात विविध मंत्र्यांची नावे असलेली कागदपत्रे सादर केल्याबद्दल नाराजी ओम बिर्लांनी नाराजी व्यक्त केली. महत्वाच्यावेळी मंत्री उपस्थित नसल्यामुळे बिर्ला नाराज झाले आणि संबंधित मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहाणे गरजेचे असल्याची टिप्पणी केली. दरम्यान, सभागृहात मंत्री उपस्थित नसतात, तेव्हा प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुपारी 12 वाजता विषयपत्रिकेत नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित मंत्र्याच्या वतीने सभागृहाच्या टेबलावर ठेवली जातात.

तुम्ही एकमेकांना समजावून सांगू नकासभागृहात आवश्यक फॉर्म सादर करताना संसदीय कामकाज राज्यमंत्री मेघवाल यांनी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या नावाचा कागदपत्र ठेवला. यावेळी बिर्ला म्हणाले की, उद्योगमंत्री पियुष गोयल सभागृहात बसले होते आणि त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगायला हवे होते. यानंतर गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमारांना त्यांच्या नावाची कागदपत्रे सभागृहाच्या टेबलवर मांडायची होती, पण काही अडचण आल्यामुळे इतर मंत्री त्यांना समजावून सांगू लागले. त्यावर बिर्लांनी, एकमेकांना समजावून सांगू नका, असे म्हटले.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसom birlaओम बिर्ला