लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे शेवटचे भाषण असेल...; ममता बॅनर्जींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 23:20 IST2023-08-14T23:17:12+5:302023-08-14T23:20:01+5:30
विरोधी पक्षांची आघाडी लवकरच गती घेईल आणि २०२४च्या लोकसभा निवडणूकीत विजय नोंदवेल, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे शेवटचे भाषण असेल...; ममता बॅनर्जींचा दावा
नवी दिल्ली: उद्या होणारं म्हणजे १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे भाषण हे त्यांचे शेवटचं भाषण असेल, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. विरोधी पक्षांची आघाडी लवकरच गती घेईल आणि २०२४च्या लोकसभा निवडणूकीत विजय नोंदवेल, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी यांनी इस्रायलच्या हेरगिरी सॉफ्टवेअर पेगाससचा संदर्भ देत म्हणाल्या, 'आपण खरोखर मुक्त आहोत का? राजकीयदृष्ट्या नाही. पेगाससने आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. याशिवाय ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोपही केला. काही वेळापूर्वी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मला फोन केला आणि केंद्रीय यंत्रणा त्यांना कशा प्रकारे त्रास देत आहेत, याबाबत मला माहिती दिली.
राफेल विमान खरेदी आणि संशयित सौद्यांमधील उच्च-मूल्याच्या नोटांचे नोटाबंदीचा संदर्भ देऊन केंद्रातील भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही ममता बॅनर्जींनी केला. बंगालमध्ये, भ्रष्टाचाराच्या काही घटना घडल्या आहेत ज्यांच्या विरोधात आम्ही तात्काळ पावले उचलली आहेत. तथापि, केंद्र सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मग ते राफेल जेट डील असो किंवा २००० रुपयांच्या नोटांची नोटाबंदी असो," असं ममता बॅनर्जी म्हणाले.