शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:18 IST

ओवेसी म्हणाले, ''BCCI ला एका क्रिकेट सामन्यातून किती पैसे मिळतील? ₹2,000 करोड़, ₹3,000 करोड़? आम्हाला सांगा, आपल्या 26 नागरिकांचा जीव अधिक आहे की, पैसा? हे भाजपने सांगायला हवे."

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला सात विकेटने हरवून शानदार विजय मिळवला. मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये उडालेल्या लष्करी संघर्षानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यातील भारताच्या विजयाने क्रिकेट प्रेमिंना तर खुश केलेच. शिवाय, या सामन्याने राजकारणही तापले होते. यातच आता, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भारताने सर्वत्र विजय मिळवायला हवा, मग क्रिकेटचा सामना असो अथवा दहशतवाद्यांना प्रत्युत्तर. पण जे आपल्या मुलींना विधवा आणि मुलांना अनाथ बनवत आहेत, त्यांच्या सोबत खेळणे, हे विजयाचे परिमाण असू शकत नाही. हा विजय असू शकत नाही. दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत, २६ भारतीय नागरिकांचे जीवन अधिक मौल्यवान आहेत की क्रिकेट सामन्यातून मिळवलेले कोट्यवधी रुपये? असा प्रश्नही ओवेसी यांनी यावेळी सरकारला केला.

भाजप आणि देशभक्ती -दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या, 'पानी और खून एक साथ नहीं बह सकते, आतंक और बातचीत संभव नहीं', या विधानाची आठवण करून देत ओवेसी म्हणाले, "भाजप आपल्या देशभक्तीच्या धोरणासंदर्भात क्रिकेट येताच तडजोड करतो. ते म्हणाले, ''BCCI ला एका क्रिकेट सामन्यातून किती पैसे मिळतील? ₹2,000 करोड़, ₹3,000 करोड़? आम्हाला सांगा, आपल्या 26 नागरिकांचा जीव अधिक आहे की, पैसा? हे भाजपने सांगायला हवे.

पहलगाम दहशतवादी हल्ला - गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान तसेच पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. या लष्करी कारवाईत क्षेपणास्त्रे, ड्रोन आदींचा वापर करण्यात आला. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा