शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मला पाकिस्तानात जा म्हणणारे हे कोण?, शशी थरुर यांचा भाजपा, RSSवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:25 IST

'हिंदू पाकिस्तान' संदर्भात केलेल्या विधानावरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नसतानाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

तिरुअनंतपुरम - 'हिंदू पाकिस्तान' संदर्भात केलेल्या विधानावरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नसतानाही काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ''भाजपा आणि आरएसएस हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत'',अशी वादग्रस्त आणि जहरी टीका शशी थरुर यांनी मंगळवारी (16 जुलै) केली.

तिरुअनंतपुरममधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना थरुर म्हणाले की, भाजपाचे लोक मला पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगत आहेत. मी त्यांच्याप्रमाणे हिंदू नाही हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? मला देशात राहण्याचा अधिकारी नाही का? या लोकांनी हिंदुत्वाचे तालिबानीकरण सुरू केले आहे का?, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करत थरुर यांनी भाजपा/ आरएसएसवर हल्लाबोल चढवला. यामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, लोकसभा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल, असे विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी(16 जुलै) शशी थरुर यांच्या येथील मतदारसंघ कार्यालयात गोंधळ घातला.‘हिंदू पाकिस्तान’चे कार्यालय असा फलक लावून त्यांना मी पाकिस्तानात निघून जावे, अशा घोषणाही दिल्या, अशी माहिती थरुर यांनी ट्विटद्वारे दिली.

...तर भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होईल- थरुर

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असे विधान शशी थरुर यांनी केले होते. 'भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास नव्यानं घटना लिहिली जाईल. त्यामुळे भारतामधील परिस्थिती पाकिस्तानसारखी होईल. मग या देशात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा कोणताही सन्मान केला जाणार नाही,' असं थरुर म्हणाले होते.शशी थरुर यांनी कडव्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं. 'ते (भाजपा) पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकले तर, आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था संपेल. त्यांच्याकडून घटना उद्ध्वस्त केली जाईल. त्यांची नवी घटना हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतावर आधारित असेल. त्यामुळे अल्पसंख्याकांचे अधिकार संपुष्टात येतील. देशाचा हिंदू पाकिस्तान होईल. महात्मा गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आजाद आणि स्वातंत्र्यासाठी झटलेल्या अनेक महान व्यक्तींनी अशा देशासाठी संघर्ष केला नव्हता,' अशा शब्दांमध्ये थरुर यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस