CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी? दररोज किती रुग्ण सापडणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:52 PM2021-12-07T12:52:22+5:302021-12-07T12:54:13+5:30

CoronaVirus News: ओमायक्रॉननं चिंता वाढवली; देशात तिसरी लाट येण्याची शक्यता

third wave may hit to india by february with omicron corona new variant | CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी? दररोज किती रुग्ण सापडणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी? दररोज किती रुग्ण सापडणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

Next

मुंबई: नवी दिल्ली: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा २० च्या पुढे गेला आहे. राज्यात आतापर्यंत १० जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन अधिक संक्रामक आहे. त्याचा फैलाव अतिशय वेगानं होतो. ओमायक्रॉनमुळे देशात तिसरी लाट येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत टोक गाठेल. त्यावेळी देशात एक ते दीड लाख रुग्ण आढळून येतील, असा अंदाज आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल. फेब्रुवारीत तिसरी लाट येऊ शकेल. तिची तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल. ओमायक्रॉनची लागण झाल्यावर होणारे परिणाम डेल्टाइतके गंभीर नसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे, असं असं आयआयटीचे शास्त्रज्ञ मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं.

देशात लॉकडाऊन लागणार?
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला. तिथे आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अद्याप तरी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं नाही. नवा व्हेरिएंट जास्त संक्रामक आहे. मात्र त्याचा परिणाम गंभीर नाही. तो डेल्टाच्या तुलनेत अतिशय कमी आहे, असं अग्रवाल म्हणाले. रात्री संचारबंदी लागू केल्यास, गर्दीवर निर्बंध आणल्यास कोरोनाचा फैलाव कमी होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या देशात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. पैकी १० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राजस्थानमध्ये ९ रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकमध्ये २, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. २ डिसेंबरला देशात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. बंगळुरूमध्ये हा रुग्ण आढळून आला. रविवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण सापडले. यापैकी ६ जण एकाच कुटुंबातील आहेत.

Read in English

Web Title: third wave may hit to india by february with omicron corona new variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.