शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 भाजपा, काँग्रेसविरोधात तिसरी आघाडी, ममता-केसीआर यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 20:32 IST

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात बलाढ्य झालेल्या भाजपाविरोधात  विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जंग जंग पछाडत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेसविरोधात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे.

कोलकाता - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात बलाढ्य झालेल्या भाजपाविरोधात  विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जंग जंग पछाडत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेसविरोधात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे. सोमवारी कोलकाता येथे झालेल्या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांविरोधात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे.  

तृणमुक काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेबाबत चर्चा केली. देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या चर्चेनंतर ही एक चांगली सुरुवात असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. " मला वाटते राजकारण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि आमच्यामध्ये जी चर्चा झाली तिचे केंद्र देशाचा विकास हे होते. राजकारण तुम्हाला अशा स्थितीमध्ये आणते, जिथे तुम्हाला विविध प्रकारच्या लोकांसोबत काम करावे लागते."असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तर स्वत:ला राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी तिसरी आघाडी ही सामुहिक नेतृत्व असल्याचे सांगितले."हे एक सामुहिक आणि संघीय नेतृत्व असेल, ज्यामध्ये सगळे जण एकत्र असतील. 2019 पूर्वी एक तिसरी आघाडीही तयार होईल, असे लोकांना वाटत आहे. मी स्पष्टपणे सांगतो की ही तिसरी आघाडी देशातील जनतेसाठी असेल," असे चंद्रशेखर राव म्हणाले. 

 

 

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जी