राज्य हौशी नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा नोव्हेंबरपासून
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30
३१ ऑगस्ट प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख

राज्य हौशी नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा नोव्हेंबरपासून
३ ऑगस्ट प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख पुणे : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणारी ५५ वी हौशी मराठी नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा नोव्हेंबरपासून वाजणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर १७ नोव्हेंबरपासून सुरू होईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. हौशी मराठी नाट्य स्पर्धेबरोबरच १३ व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ७ डिसेंबरपासून राज्यातील एकूण पाच महसूली विभागात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हिंदी, संगीत आणि संस्कृत भाषेतील नाट्य स्पर्धा डिसेंबर २०१५ व जानेवारी २००१६मध्ये दरम्यान भरविण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्या नाट्य संस्थांनी ६६६.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरील विहीत नमुन्यातील प्रवेशिका भरून पाठवणे आवश्यक आहे. तसेच डीडी व आवश्यक कागदपत्रांसह ३१ ऑगस्टपर्यंत संचालक, सांस्कृतिक कार्य जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ या पत्यावर या प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.---------------------------------------