परिवर्तनवादी विचारांचा सामना विचारांनी करा

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:12+5:302015-02-16T23:55:12+5:30

सामाजिक कार्यकर्त्यांचे आव्हान : कॉ. गोविंद पानसरे व उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध

Think of a changeist ideology | परिवर्तनवादी विचारांचा सामना विचारांनी करा

परिवर्तनवादी विचारांचा सामना विचारांनी करा

माजिक कार्यकर्त्यांचे आव्हान : कॉ. गोविंद पानसरे व उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. असे असताना कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो, ही बाब म्हणजे देशात फॅसिस्ट शक्ती मोठ्या प्रमाणात काम करत असून, लोकशाही देशात हुकुमशाही पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हिंमत असेल, तर विचारांचा सामना विचारांनी करण्यासाठी समोरासमोर या, माणूस मारुन त्यांचा विचार संपविता येत नाही, अशा तीव्र शब्दांत अनेक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी फॅसिस्ट आणि धर्मांध शक्तींना थेट आव्हान दिले.
कॉ. गोविंद पानसरे आणि उमाताई पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर निषेध करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून या प्रकारामागील शक्तींचा तातडीने तपास करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
आम आदमी पार्टी, लोकायत, भारिप बहुजन महासंघ, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मनपा कामगार युनियन, संभाजी ब्रिगेड, हमाल पंचायत, छावा युवा संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्र सेवा दल, मुक्तीवादी युवा संघटना, श्रमिक मुक्ती दल, सत्यशोधक जनआंदोलन , सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, एसएफआय, दलित, आदिवासी विकास आंदोलन, धर्मनिरपेक्ष पुरोगामी संघटना कृती समिती, स्त्रीमुक्ती आंदोलन, जनवादी महिला संघटना, जनमुक्ती संघर्ष वाहिनी, जनता दल, इंटक आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यात प्रा. सुभाष वारे, विद्या बाळ, रजिया पटेल, अजित अभ्यंकर, शांता रानडे, सुहास कोल्हेकर, अलका जोशी, मिलिंद देशमुख, म. ना. कांबळे, किरण मोघे, विठ्ठल सातव, एम. पी. गाडेकर, किशोर ढमाले, आमदार दीप्ती चवधरी, डॉ. संजय दाभाडे, मनीषा गुुप्ते, प्रताप गुरव, किरण कदम, सुनीती सु. र. , अशोक धिवरे, प्रा. नीतीश नवसागरे, सुषमा अंधारे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नीरज जैन, मुक्ता मनोहर, हाजीभाई नदाफ यांनी सहभाग घेतला. जुल्म की टक्कर मे, संघर्ष हमारा नारा है...म्हणत तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
------

Web Title: Think of a changeist ideology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.