नवी दिल्ली : दिल्लीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येथील लोक चोरट्यांपासून सावध आहेत. मात्र, चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत पाच दुकानातून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइलची लूट केली आहे. ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उजेडात आली आहे. मंगळवारी पाच चोरट्यांनी रस्त्यावर डान्स केला. यावेळा एकजण सीसीटीव्हीच्यासमोर तोंडावर रुमाल बांधून मिथुन स्टाईलने डान्स करत होता. सीसीटीव्हीच्या फूटेजमधून असे दिसून येत होते की तो मुद्दाम डान्स करत होता. त्याच्या बाकीच्या साथीदारांनी पाठिमागे असणा-या दुकानांची शटर उघडली आणि त्या दुकांनामधून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइल लंपास केले.
चोरट्यांनी डान्स करत पाच दुकानांची केली लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 14:31 IST