शेतकर्‍यांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:55+5:302015-02-14T23:51:55+5:30

वाकोद शनिवार बाजारात लिलावादरम्यान ५० हजारांची चोरी

Thieves on farmers' money | शेतकर्‍यांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

शेतकर्‍यांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

कोद शनिवार बाजारात लिलावादरम्यान ५० हजारांची चोरी
चोर्‍यांचे सत्र सुरू
वाकोद, ता.जामनेर : येथे शनिवारच्या आठवडे बाजारात सकाळी ६.३० वाजेपासून दूरदूरवरून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांची संख्यादेखील मोठी असते. विविध ठिकाणांहून आलेले भाजीपाला खरेदीदार व विक्रीदार सकाळपासूनच या बाजारात लिलावात सहभागी होतात. शनिवार १४ रोजी लिलाव संपल्यानंतर ज्या-ज्या शेतकर्‍यांचा घेतलेले माल याची किंमत लावून नोंदणी बिलासह पैशांची रक्कम बॅगेत गुंडाळून ठेवलेल्या होत्या. जवळपास यात शेतकर्‍यांना देण्यासाठी व्यापार्‍याने ४५ ते ५० हजारांची रक्कम, बिले, पावत्या व व‘ा असलेली काळ्या रंगाची बॅग अज्ञात चोरट्याने लांबविली. यात व्यापार्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सदर चोरट्याने या पैशांच्या बॅगेवर पाळत ठेवून लंपास केल्याचे समजते.
अर्जुन तुळशीराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी वाकोद बिट पोलीस साहेबराव पाटील यांनी भेट दिली.
चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ : वाकोदसह परिसरात भुरट्या चोर्‍या वाढत असून गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोर्‍यांमध्ये वाढ झालेली पाहता पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Web Title: Thieves on farmers' money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.