चोरट्यास अटक

By Admin | Updated: October 21, 2016 00:18 IST2016-10-21T00:18:22+5:302016-10-21T00:18:22+5:30

मौदा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव शिवारातील अल्ट्राटेक कंपनीच्या आवारात चोरी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यातील चोरट्यास मौदा पोलिसांनी अटक केली.

Thieves arrested | चोरट्यास अटक

चोरट्यास अटक

दा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव शिवारातील अल्ट्राटेक कंपनीच्या आवारात चोरी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यातील चोरट्यास मौदा पोलिसांनी अटक केली.
कृष्णा त्र्यंबक सातपुते (३०, रा. वैशालीनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नवेगाव शिवारात अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे. कृष्णा व त्याच्या अन्य एका सहकाऱ्याने या कंपनीच्या आवारात प्रवेश केला आणि तिथून ८५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या चोरून नेल्या. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून कृष्णा सातपुते यास अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
***
जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
भिवापूर : जळाल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी (नांद) येथे नुकतीच घडली.
नूतन अतुल बडगे (२०, रा. खापरी, नांद, ता. भिवापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला ही तिच्या घरी स्वयंपाकाच्या ओट्यावर रॉकेलच्या स्टोव्हवर पाहुण्यांसाठी चहा तयार करीत होती. अनावधानाने पेटता स्टोव्ह अंगावर पडल्याने तिच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यात गंभीररीत्या जळाल्याने तिला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: Thieves arrested