शहरं
Join us  
Trending Stories
1
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
2
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
3
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
4
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
5
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
6
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
7
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
8
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवारा मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
9
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
10
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
11
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन
12
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
13
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
14
Godfrey Phillipsचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आईवरच केला हल्ल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
15
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
16
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
17
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
18
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
19
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
20
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी

सत्तेत आल्यास राम मंदिरावर 'ते' बुलडोझर चालवतील...;  'इंडिया' आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:23 PM

सलग दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जागांसाठी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतला.

हमीरपूर / बाराबंकी/ फतेहपूर : केंद्रात सपा-काँग्रेसची सत्ता आल्यास ते रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवतील आणि मंदिरावर बुलडोझर चालवतील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया' आघाडीवर केली.

सलग दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जागांसाठी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतला. यावेळी नरेंद्र मोदींनी राज्यातील त्यांचे विरोधक असलेल्या समाजवादी आणि काँग्रेसवर जोरदार घणाघात सुरूच ठेवला आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला लक्ष्य करताना पंतप्रधानांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान म्हणाले की, 'सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने रामनवमीच्या दिवशी म्हटले होते की, राम मंदिर निरूपयोगी आहे. त्याचवेळी काँग्रेस राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या तयारीत आहे. ते राम मंदिरावर बुलडोझर चालवितील. त्यांच्यासाठी फक्त त्यांचे कुटुंब आणि सत्ता महत्त्वाची आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, बुलडोझरचा योग्य वापर कसा करावा, हे आमच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून शिका, असे पंतप्रधान म्हणाले.

'व्होट जिहाद' करणाऱ्यांना तुमची मालमत्ता देतील...

पंतप्रधान मोदींनी हमीरपूर येथील सभेत सपा व काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, 'ते निवडणुकीत तुमची मते घेतील, पण सत्तेत आल्यानंतर त्यांच्यासाठी 'व्होट जिहाद' करणाऱ्यांना तुमची मालमत्ता वाटून टाकतील. काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस म्हणत आहे की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पण या धमकी देणाऱ्यांना हे माहीत नाही की, ते राखण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नाहीत. ते म्हणतात की त्यांच्याकडे क्षेपणास्त्रे आहेत. आम्ही बुंदेलखंडमध्ये जो संरक्षण कॉरिडॉर बनवत आहोत, तो फटाके बनविण्यासाठी नाही, क्षेपणास्त्रे बन- विण्यासाठी आहे,' असे मोदी म्हणाले.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा