आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:27 IST2025-05-22T16:26:23+5:302025-05-22T16:27:12+5:30
Two Israeli Embassy Staff Members Shot Dead: दीड वर्षांपूर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर इस्राइलने गाझापट्टीमध्ये हमासविरोधात सुरू केलेली कारवाई अद्याप थांबलेली नाही. त्याचदरम्यान, अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये एका ज्यू संग्रहालाबाहेर इस्राइलच्या दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी
दीड वर्षांपूर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर इस्राइलने गाझापट्टीमध्ये हमासविरोधात सुरू केलेली कारवाई अद्याप थांबलेली नाही. त्याचदरम्यान, अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये एका ज्यू संग्रहालाबाहेर इस्राइलच्या दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हत्या झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांबाबत आता भावूक करणारी माहिती समोर आली आहे. हे दोघेही अमेरिकन ज्यू कर्मचारी होते. ते एकमेकांवर प्रेम करत होते. तसेच ते लवकरच लग्न करणार होते. मात्र तत्पूर्वीच हत्या झाल्यामुळे त्यांची प्रेमकहाणी अधुरी राहिली आहे.
वॉशिंग्टनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची यारोन लिस्चिंस्की आणि सारा मिल्ग्रिम अशी नावं आहेत. इस्राइली दूतावासाने सांगितले की, यारोन आणि सारा एकमेकांचे चांगले मित्र आणि सहकारी होते. दोघांचीही अधिकारी म्हणून कारकीर्द ऐन बहरात होता. दरम्यान, हे दोघेही ज्यू संग्रहालयात आयोजित एका कार्यक्रमातून परतत असताना एका दहशतवाद्याने त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला असून, आमचा संपूर्ण कर्मचारी वर्ग शोकाकुल आहे.
इस्राइलच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, कुठलेही शब्द आमचं दु:ख व्यक्त करू शकत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रति आम्ही संवेदना व्यक्त करतो. या कठीण प्रसंगात आमचा दूतावास त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहील.
इस्राइलचे अमेरिकेतील राजदूत येशिल लेटर यांनी सांगितले की, सारा आणि यारोद हे लवकरच साखरपुडा करणार होते. यारोन याने सारा हिच्यासाठी याच आठवड्यात एक अंगठी खरेदी केली होती. पुढच्या आठवड्यात तो जेरुसलेम येथे सारा हिला लग्नासाठी प्रपोज करणार होता. ते एक सुंदर जोडपं होतं, अशा शब्दात येशिल यांना हळहळ व्यक्त केली.