त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 05:51 IST2025-06-29T05:50:45+5:302025-06-29T05:51:04+5:30

बिहारमधील पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये शनिवारी मोबाइल फोनच्या ॲपचा वापर करून मतदान करण्यात आले.

They voted from home on their mobile phones, when will their numbers be available? | त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?

त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?

मुंबई : बिहारमधील पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये शनिवारी मोबाइल फोनच्या ॲपचा वापर करून मतदान करण्यात आले. तेथील विशिष्ट मतदारांसाठी प्रायोगिक स्वरूपात ही प्रक्रिया राबविण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला आणि स्थलांतर केलेले मतदार जे केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाही. त्यांनी या ई-मतदान योजनेचा लाभ घेऊन ॲपच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यासाठी निर्धारित प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात पार पडली. त्यामुळे अशा प्रकारे मतदान करून घेणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

कसे केले मतदारांनी मोबाइलवरून मतदान

१.     नोंदणी आणि लॉगिन प्रक्रिया : मतदारांनी Play Store मधून e-Voting SECBHR ॲप डाऊनलोड केले.

२.     मुलभूत माहिती भरली : नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC नंबर), वय, पत्ता, आणि मतदार क्षेत्र ही माहिती भरली.

३.     ओळख पटवण्यासाठी : मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला गेला, जो टाकून खात्री करण्यात आली.

४.     फेस रेकग्निशन : मतदारांनी अ‍ॅपमध्ये सेल्फी घेतली, जी लाइव्हनेस डिटेक्शनद्वारे तपासली गेली. ही प्रतिमा मतदार यादीतील फोटोशी जुळवली गेली.

५.     ओसीआर स्कॅनिंग : मतदार आयडी कार्ड स्कॅन करून माहिती वाचण्यात आली व खात्री करण्यात आली.

६.     नियोजित वेळ : २८ जून रोजी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत अ‍ॅपवर लॉगिन करून 'वोट नाऊ' बटण क्लिक केले.

७.     उमेदवाराची निवड : मतदाराने पसंतीचा उमेदवार निवडला आणि ‘कन्फर्म व्होट‘ वर क्लिक केले.

८.     मतदानाची खात्री : अंतिम पुष्टीनंतर मतदान ‘सबमिट’ झाले आणि मत सुरक्षितरीत्या ब्लॉकचेनवर नोंदवले गेले.

पुढे काय ? : ही प्रक्रिया प्रायोगिक स्वरूपात अंमलात आणली गेली. या मतदानाचा  डेटा व अडचणींचे विश्लेषण केले जाईल. पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये या प्रक्रियेच्या विस्ताराची शक्यता आहे.    

कधी लागू होऊ शकते?

२०२६ पर्यंत काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘होम वोटिंग’ किंवा ‘मोबाइल वोटिंग’ चाचणी स्वरूपात पुन्हा वापर केला जाऊ शकतो.

२०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, हे व्यापक रूपात अंमलात आणण्याचा विचार आहे.  विशेषतः एनआरआय मतदारांसाठी अवलंब होऊ शकतो.

तु्म्हालाही हे प्रश्न असतील तर जाणून घ्या उत्तरे

प्रश्न : सर्व मतदार या ई-मतदान ॲपचा वापर सध्या करू शकतात का?

उत्तर : सध्या फक्त पात्र व्यक्ती,

वृद्ध, दिव्यांग, प्रवासी यांनाच हा

पर्याय देण्यात आला आहे.

प्रश्न : मतदान गुप्त राहते का ?

उत्तर : होय, मतदान पूर्णपणे

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आणि ब्लॉकचेनवर नोंदवले जाते.

प्रश्न : एकाच मोबाइल क्रमांकावरून किती जण नोंदणी करू शकतात?

उत्तर : केवळ दोन मतदारांना परवानगी.

प्रश्न : मोबाइलद्वारे मतदान करण्यासाठी इंटरनेट लागते का?

उत्तर : होय, इंटरनेट आवश्यक आहे.

Web Title: They voted from home on their mobile phones, when will their numbers be available?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.