शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जामिन मिळाला त्यांनी आनंद घ्यावा; ही आणीबाणी नाहीय! मोदींचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 19:05 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनामध्ये मोदी बोलत होते.

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले असून ज्यांना जामिन मिळाला आहे त्यांनी आनंद घ्यावा, उठसूठ तुरुंगात टाकायला ही काही आणीबाणी नाही, असा टोलाही लगावला आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनामध्ये मोदी बोलत होते. सोमवारी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी मोदी आणि भाजपा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी भ्रष्टाचारी असल्याचे आरोप करत दोनवेळा सत्तेवर आले आहे. जर ते चोर असतील तर संसदेत कसे बसलेत, असा सवाल मोदींना केला होता. तसेच मोदींवर टीका करताना त्यांची जीभही घसरली होती. यावर मोदींनी आज उत्तर दिले आहे. 

मोदींनी सांगितले की, आम्हाला अशासाठी दोषी धरले जात आहे की काही लोकांना आम्ही तुरुंगात टाकले नाही. ही काही आणीबाणी नाहीय की सरकार कोणालाही तुरुंगात डांबेल. ही लोकशाही आहे आणि न्यायव्यवस्था याचा निर्णय घेईल. आम्ही कायद्याला त्याचे काम करायला देतो. जर कोणाला जामिन मिळाला असेल त्याने आनंद घ्यावा. आम्ही बदला घेण्यावर विश्वास ठेवत नाही पण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई जरूर सुरू ठेवणार. आम्हाला देशाने एवढे दिले आहे की चुकीच्या रस्त्यावर जाण्याची गरज नाही. 

संसदेत सांगितले गेले की, माझ्या उंचीला कोणी मोजू शकत नाही. पण आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. मी कोणाची रेषा छोटी करण्यावर विश्वास ठेवत नाही, तर आपली रेषा मोठी करण्यावर जीवन खर्ची घालतो. तुमची उंची तुम्हालाच लखलाभ असे सांगत मोदींनी काँग्रेसला आणखी एक टोला लगावला. तुम्ही एवढ्या उंचीवर गेलात की पायाखालची जमीन दिसणे बंद झाले आहे. तुमची उंची आणखी वाढल्यास मला आनंदच होईल. आमचे स्वप्न उंच होण्याचे नसून मुळांशी जोडण्याचे आहे. या स्पर्धेत उलट आमच्या शुभेच्छाच आहेत, असे मोदी म्हणाले.

आणीबाणीचा डाग मिटणारा नाही....25 जूनच्या रात्रीने देशाचा आत्मा चिरडला होता. यामुळे लोकांना या दिवशी काय असते याची माहिती आहे. भारतातील लोकशाही ही काही संविधानाच्या पानांतून तयार झाली नाही, तर ती कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. प्रसारमाध्यमांना दाबण्यात आले. महापुरुषांना तुरुंगात डांबण्यात आले. देशालाच तुरुंग बनविण्यात आले होते. न्यायव्यवस्थेचा अपमान कसा करावा याचे जिवंत उदाहरण होते. हा डाग कधीच मिटणारा नाही, असेही मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा