शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक शेतकऱ्यांना माहितच नाही समस्या काय, कोणाच्या सांगण्यावरून आदोलन : हेमा मालिनी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 13, 2021 11:37 IST

सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील आदेशापर्यंत दिली स्थगिती

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला दिली स्थगितीचार सदस्यीय समितीची न्यायालयाकडून स्थापना

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात आतापर्यंत झालेल्या बैठकांमधून अद्यापही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली असून यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी त्या समितीलाही विरोध केला आहे. अशातच भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांना या कायद्यात काय समस्या आहेत हेच माहित नाही, असं म्हणत हेमा मालिनी यांनी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं."आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हेच माहित नाही की त्यांना काय हवंय. नव्या कृषी कायद्यांबाबत समस्या काय याचीदेखील त्यांना माहिती नाही. यावरून ते कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले आहेत हे स्पष्ट होतं," असं हेमा मालिनी म्हणाल्या. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यापूर्वीही भाजपाच्या अनेक नेत्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच या आंदोलनामागे विरोधक आणि खलिस्तानी समर्थक संघटनांचा हात असल्याचा दावाही काही भाजपा नेत्यांनी केला होता. न्यायालयाकडून तुर्तास स्थगितीनव्या कृषी कायद्यांना सरकारने स्थगिती द्यावी अन्यथा ते काम आम्हाला करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दांत केंद्र सरकारची कानउघाडणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त ठरलेल्या तीनही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला मंगळवारी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. तसंच या कायद्यांवरून केंद्र सरकार व शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी चार तज्ज्ञांची समितीही सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली. मात्र, या समितीशी चर्चा करण्यास नकार दर्शवतानाच आंदोलन सुरूच ठेवण्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत.

या समितीत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंह मान, शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष अनिल घनवट, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक प्रमोदकुमार जोशी आणि कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांचा समावेश आहे. ही चार सदस्यीय समिती केंद्र आणि शेतकरी संघटना यांच्यातील वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करेल, असेही न्यायालयानं स्पष्ट केलं.तज्ज्ञ समितीच्या सदस्यांवर आक्षेप 

सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समितीसाठी जी चार नावे सुचवली आहेत त्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. हे सर्व जण कृषी कायद्यांचे समर्थक असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. तसेच ही तर सरकारी समिती असून त्यांच्याशी काय चर्चा करायची असा सवाल आंदोलकांचे नेते योगेंद्र यादव यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीBJPभाजपाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय