- बलवंत तक्षकचंडीगड : अशी एखादी शाळा असू शकते का, जिथे विद्यार्थ्यांचा गोंधळ अजिबात होत नसेल? किंवा गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक शांत राहायला सांगत नसतील? किंवा आपल्या मुलाला दुसºया शाळेत घातल्याने तिथे काम करणाºया महिलेची नोकरी जाऊ शकेल?या सर्व प्रश्नांची उत्तरे हो अशी आहेत. अशी एक शाळा हरयाणाच्या मेवाणी जिल्ह्यामध्ये आहे. तेथील ढाणी जादुसाळा गावातील शाळेत फक्त एकच विद्यार्थिनी शिकतो. त्यामुळे त्या शाळेत वा वर्गात कधीही गोंधळ ऐकू येत नाही. त्यामुळे तिला ओरडायची शिक्षकांना गरजच भासत नाही. अर्थात शाळेत एकच विद्यार्थी असल्याने त्याला किवायला शिक्षकही एकच आहे. ती विद्यार्थिनी पाचवीत आहे. ती रोज न चुकता शाळेत येतो. तिची आईच तिला घेऊ न येते आणि तीच तिला शाळेतून घरी नेतेही.ती मुलगी शाळेत येते, अभ्यास करते. पण सोबत खेळायलाही कोणी नसते. बोलणार तरी कोणाशी? फक्त शिक्षकांशी? त्यांच्याशी अभ्यासाशिवाय अन्य कोणत्याच विषयावर बोलता येत नाही. त्यांना त्रास देता येत नाही. त्यामुळे ती अगदी कंटाळून जाते. तरी तिची आई न चुकता तिला शाळेत आणतेच. शाळेची वेळ आहे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत.त्या शाळेत आणखी एक व्यक्ती कामाला आहे. तिचे नाव आहे गीता. माध्यान्ह भोजन (मिड डे मिल) तयार करण्यासाठी तिची नेमणूक झाली आहे. तिला केवळ एका मुलीसाठीच स्वयंपाक करावा लागतो. पण आपल्या मुलीसाठी आपण सारे करतो आहोत, इतक्या प्रेमाने ती माध्यान्ह भोजन तयार करून देते.आपल्या मुलीला दुसºया शाळेत घालायची तिची इच्छा आहे. पण तसे केले तर तिची नोकरीच जाईल. नोकरी टिकवण्यासाठी ते हे सारे अगदी मन लावून करते. कारण शाळेतील विद्यार्थिनी ही तिचीच मुलगी आहे. गीताच्या पगारावरच घर चालते. त्यामुळे तिने मुलीलाही याच शाळेत प्रवेश घ्यायला लावला.विद्यार्थी गळत गेलेशाळेत आणखी विद्यार्थी नसल्याबद्दल जिल्हा शिक्षण अधिकाºयांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही चंदीगडमध्ये शिक्षण संचालनालयाला याची माहिती आधीच दिली आहे. आणखी विद्यार्थी नसल्याने शाळेत कसलाही कार्यक्रम होत नाही वा स्पर्धाही होत नाहीत. तीन वर्षांपूर्वी शाळेत सात विद्यार्थी होते. कमी होत होत आणि एकच विद्यार्थी शिल्लक राहिला आहे. शाळेतील एकमेव शिक्षक पवनकुमार म्हणाले की आणखी विद्यार्थी नाहीत, म्हणून इतर शिक्षकही नाहीत. त्यामुळे माझेही आयुष्य कंटाळवाणे झाले आहे. पण नोकरी तर करायलाच हवी. अर्थात शिक्षण खाते याबाबत काही करेल, अशी शक्यताही दिसत नाही. अर्थात रेवाडीमध्ये अशा आणखीही काही शाळा आहेत, जिथे अशीच अवस्था आहे.
'या' शाळेत फक्त एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:28 IST