शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

...त्यामुळे याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, सुनावणीदरम्यान कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 13:09 IST

Shiv Sena Vs Shide Group, Supreme Court: हे प्रकरण दहाव्या सूचीच्या पलिकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, असं निरीक्षण सुनावणीदरम्यान घटनापीठाकडून नोंद करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारच्या भवितव्याबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.आज सुनावणी सुरू असताना हे प्रकरण दहाव्या सूचीच्या पलिकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, असं निरीक्षण सुनावणीदरम्यान घटनापीठाकडून नोंद करण्यात आलं आहे.

आज सुनावणीला सुरुवात झाल्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर आधी निर्णय व्हावा असा मुद्दा लावून धरला. तसेच या आमदारांना विलिनीकरण करावेच लागेल, अन्यथा ते अपात्र ठरतात, हा मुद्दा घटनापीठासमोर अधोरेखित केला. तर शिंदे गटाचे वकील कौल यांनी आमच्या बहुमताबाबत अध्यक्ष किंवा दुसरा गट कसा काय निर्णय घेईल, असा प्रश्न उपस्थित केला.तसेच ठाकरे गट प्रत्येक प्रश्न कोर्टात आणतोय, अशी तक्रारही त्यांनी केली आहे. 

दरम्यान, ही सुनावणी सुरू असाताना घटनापीठामधील न्यायाधीशांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहे. आमदार अपात्र ठरल्यास काय होईल? अपात्र आमदार निवडणूक आयोगासमोर गेल्यास काय होईल, असे प्रश्न न्यायाधीशांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच तुम्ही संबंधित नेत्यांना पक्षातून काढून टाकल्याचे निवडणूक आयोगाला कळवले होते का? अशी विचारणाही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे केली आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय