नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेते सईद अली शाह गिलानी यांना संपविण्याचा कट आखण्यात आला; पण हा कट प्रत्यक्षात येण्याआधीच गुंडाळण्यात आला, असा गौप्यस्फोट रॉचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी केला आहे. भारतीय गुप्तचर संघटना रॉचे माजी प्रमुख दुलत यांनी आपल्या कारकीर्दीतील घटनांवर पुस्तक लिहिले असून, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. सईद अली शाह गिलानी आयएसआयच्या जवळ होते, असेही ते म्हणाले.
फुटीर गिलानीला संपविण्याचा डाव होता -दुलत
By admin | Updated: July 7, 2015 23:10 IST