शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:50 IST

खर्गे म्हणाले, आपम कुणालाही दोषी ठरवण्यासाठी हा आकडा बोललेलो नाही...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी राज्यसभेत, महाकुंभ मेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत "हजारो" लोकांचा मृत्यू झाला, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर, सभागृहात एक गदारोळ झाला. यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, "खर्गे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, वरिष्ठ सभागृहात झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, महाकुंभ मेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत 'हजारो' लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले आणि सभागडहात गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर खर्गे लगेचच म्हणाले की, "हा माझा अनुमान आहे. जर हे खरे नसेल, तर आपण (सरकारने) खरा आकजा सांगाला हवा. मी कुणालाही दोष देण्यासाठी 'हजारो' शब्द वापरला नाही. पण किमान किती लोकांचा मृत्यू झाला? याची माहिती तरी द्या. जर मी चुकलो असेल तर माफीही मागेन. त्यांनी किती लोक मारले गेले, किती बेपत्ता आहेत याची माहिती दियायला हवी."

काय म्हणाले होते खर्गे? - गेल्या 29 जानेवारीला मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर स्नानावेळी चेंगराचेंगरी झाली होती. यात सरकारी आकडेवारीनुसार, ३० जणांचा मृत्यू झाला होता. खर्गे म्हणाले, "मी महाकुंभ मेळ्यात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. कुंभ मेळ्यात मृत्यू पावलेल्या हजारो लोकांना...," यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला.

धनखड म्हणाले, विधान मागे घ्या -यासंदर्भात सभापती धनखड यांनी खर्गे यांना त्यांचे विधान मागे घेण्याचे आवाहन केले. धनखड म्हणाले, "विरोधी पक्षनेत्यांनी हजारोंच्या संख्येने आकडे दिले आहेत... मी त्यांना आवाहन करतो की या सभागृहात जे काही बोलले जाते ते अत्यंत महत्त्वाचे आहे.' आपण असे काही बोलला आहात की, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. येथून जाणारा संदेश, मग त्याचे भलेही खंडन झालेले असो, तो संपूर्ण जगात जातो.’’

यावर खर्गे म्हणाले, आपम कुणालाही दोषी ठरवण्यासाठी हा आकडा बोललेलो नाही. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेKumbh Melaकुंभ मेळाcongressकाँग्रेसDeathमृत्यू