शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:17 IST

अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने रोहन गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी पक्षाला तिकीट परत केले आणि भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणी थांबायचे नाव घेत नाहीयेत. गेल्या काही काळापासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याच नेत्यांमध्ये रोहन गुप्ता यांचीही भर पडली आहे. रोहन यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर अपमान केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, रोहन यांना काँग्रेस अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण, त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने रोहन गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण, त्यांनी पक्षाला तिकीट परत केले आणि भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर रोहन म्हणाले, 'मी माझ्या स्वाभिमानासाठी काँग्रेस सोडली. तिथे माझा रोज अपमान व्हायचा. मी स्वतः भाजपच्या वॉशिंग मशीनवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. माझे चारित्र्य पूर्णपणे स्वच्छ आहे. सनातनचा अपमान करणाऱ्यांसोबत काम करता येणार नाही. ज्यांच्या नावातच राम आहे, ते रामाच्या बाजूने आणि सनातनच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगायचे, असा आरोप त्यांनी केला.

 

देशासाठी काम करण्याची भावनाभाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहन गुप्ता म्हणाले, आज मला भाजपमध्ये प्रवेश करताना अभिमान वाटतो. देशासाठी काहीतरी करण्याची भावना घेऊन भाजपात आलो आहे. राष्ट्र उभारणीसाठी मी मनापासून काम करेन. माझे वडील 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते, मी 15 वर्षांपासून काँग्रेसमध्ये होतो. लालसेपोटी कोणीही पक्ष सोडत नाही. स्वाभिमानाचा विचार केला तर निर्णय घ्यावा लागतो.

कोण आहे रोहन गुप्ता?काँग्रेसने गुजरातच्या अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून रोहन गुप्ता यांना तिकीट दिले होते. पण त्यांनी तिकीट परत केले. रोहन यांनी 18 मार्च रोजीच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. निवडणूक लढवू नये, अशी वडिलांची इच्छा असल्याचे कारण त्यांनी त्यावेळेस दिले. यानंतर 22 मार्च रोजी त्यांनी काँग्रेसच्या संपर्क विभागाशी संबंधित एका नेत्यावर सतत अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. रोहन गुप्ता काँग्रेसचे आयटी सेल आणि सोशल मीडियाचा प्रमुख होते. तसेच, ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेही राहिले आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४gujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा