अठरा दिवसांपासून नळाला पाणी नाही
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:07+5:302015-03-20T22:40:07+5:30
फुलवळ : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १८ दिवस झाले, नळाला पाणी नाही़ यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पाणी असूनही भटकंती करण्याची वेळ फुलवळवासियांना आली आहे़

अठरा दिवसांपासून नळाला पाणी नाही
फ लवळ : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १८ दिवस झाले, नळाला पाणी नाही़ यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पाणी असूनही भटकंती करण्याची वेळ फुलवळवासियांना आली आहे़विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात हा प्रश्न नागरिकांना पडला आहे़ २ मार्च रोजी संबंधित पाणीपुरवठा करणार्या सिंचन विहिरीला वीजपुरवठा करणारा डीपी जळाला व याची कल्पना ३ मार्च रोजी सरपंच शिवहार मंगनाळे यांनी संबंधित अधिकार्यास दिली़ संबंधित अधिकार्याने दोन दिवसात नवीन डीपी देतो असे सांगितले़ परंतु आज १८ दिवस झाले तरी डीपी न दिल्याने पाणी असूनही पाण्यासाठी येथील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यास भ्रमणध्वनीवरून विचारण्यास प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी घेण्यास प्रतिसाद देत नाहीत़