गांधीजींना श्रद्धांजली वाहिलीच नाही..
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
कोपरगाव : महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिनी ११ वाजता सर्वत्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ परंतु कोपरगावमध्ये असे काही घडले नाही़ याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेच्या मुख्याधिकार्यांना जाब विचारला तसेच जिल्हाधिकार्यांकडे कारवाईची मागणी केली़

गांधीजींना श्रद्धांजली वाहिलीच नाही..
क परगाव : महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिनी ११ वाजता सर्वत्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ परंतु कोपरगावमध्ये असे काही घडले नाही़ याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेच्या मुख्याधिकार्यांना जाब विचारला तसेच जिल्हाधिकार्यांकडे कारवाईची मागणी केली़प्रशासनाच्या वतीने गुरूवारी अनाऊन्समेंट करण्यात आली़ शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भोंगा वाजल्यानंतर हुतात्म्यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करावी, असे सांगण्यात आले़ परंतु शुक्रवारी ११ वाजता भोंगा वाजलाच नाही़ त्यामुळे कोणीही श्रद्धांजलीसाठी स्तब्ध झाले नाही़ याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदिप वर्पे, जिल्हा सरचिटणीस दिपक साळूंके, किरण खर्डे आदी कार्यकर्ते नगर पालिकेत गेले, तेथे मुख्याधिकार्यांना त्यांनी जाब विचारला़ तेव्हा मुख्याधिकार्यांनी वीज पुरवठा खंडित झाला असल्याचे कारण दिले़ मुख्याधिकार्यांच्या म्हणण्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही़ त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे कारवाईची मागणी केली़ तसेच नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवकांनी राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष करावा असेही संदिप वर्पे यांनी यावेळी सांगितले़