‘मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन आज नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:42 AM2019-04-05T05:42:20+5:302019-04-05T05:43:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन लोकसभा निवडणुका होईपर्यत थोपविण्यास दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयांनी नकार दिल्यानंतर तशीच याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

There is no show of 'Modi' film today | ‘मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन आज नाहीच

‘मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन आज नाहीच

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन लोकसभा निवडणुका होईपर्यत थोपविण्यास दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयांनी नकार दिल्यानंतर तशीच याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होईल. मात्र चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्रच अद्याप न मिळाल्याने तो उद्या, शुक्रवारी प्रदर्शित होणार नाही.

 पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावरून निर्माण झालेल्या वादात हस्तक्षेप करण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आचारसंहितेचा भंग केल्याच्या कथित आरोपावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे, असे निरीक्षण मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने नोंदविले.

‘निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे आणि आता ते हे प्रकरण हाताळणार आहेत,’ असे म्हणत न्यायालयाने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केलेली जनहित याचिका निकाली काढली होती. सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनने सांगितले की, चित्रपटाच्या ट्रेलरसाठी २० मार्च रोजी परवानगी दिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्रावर बुधवारपर्यंत निर्णय घेऊ. सर्व निकष पूर्ण केले असल्यास चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करू, असे सीबीएफसीने उच्च न्यायालयाला सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाला तरी आचारसंहितेचा भंग होणार नाही,’ असा युक्तिवाद केला गेला होता.



 

Web Title: There is no show of 'Modi' film today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.