शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Vidarbha: स्वतंत्र विदर्भाचा प्रस्तावच नाही, केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 06:46 IST

Vidarbha News: महाराष्ट्रातून विदर्भाला वेगळे काढून, त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे मंगळवारी लोकसभेत स्पष्ट झाले.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातूनविदर्भाला वेगळे काढून, त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे मंगळवारी लोकसभेत स्पष्ट झाले. स्वतंत्र विदर्भ स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत नसल्याचे उत्तर आज लोकसभेत देण्यात आले.

गेली अनेक वर्षे विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी काही पक्ष व संघटना करीत आहेत. या मागणीसाठी त्या भागांत अनेक आंदोलनेही झाली. भाजपही काही वर्षांपूर्वी ही मागणी करीत होता. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण त्या सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली वा अमान्य केली, असे आज लोकसभेत दिलेल्या उत्तरामुळे उघड झाले आहे. अशोक नेते (भाजप) यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितले की, स्वतंत्र राज्याचा प्रस्ताव केंद्रापुढे नाही. तसा प्रस्ताव आहे का व त्यासंदर्भात केंद्र सरकारने काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न विचारला होता. काही व्यक्ती, संस्था, संघटनांनी  स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी निवेदने दिली आहेत. 

विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोळसा, खनिज संपत्ती, कापूस, जंगल संपत्ती आहे, पण प्रक्रिया उद्योग विदर्भाबाहेर आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाच्या विकासाला गती मिळणार नाही असे माझे मत आहे. त्यामुळे मी त्याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यावर अजून सभागृहात चर्चा होणे बाकी आहे.- अशोक नेते, खासदार, गडचिरोली-चिमूर 

टॅग्स :Vidarbhaविदर्भCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र