‘अमरसिंंह सपामध्ये परतण्याची शक्यता नाही’

By Admin | Updated: August 18, 2014 03:24 IST2014-08-18T03:24:33+5:302014-08-18T03:24:33+5:30

समाजवादी पक्षातील एककाळचे शक्तिशाली नेते अमरसिंह सपात पुन्हा परतण्याची शक्यता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी धुडकावून लावली आहे़

There is no possibility of returning to Amar Singh SP | ‘अमरसिंंह सपामध्ये परतण्याची शक्यता नाही’

‘अमरसिंंह सपामध्ये परतण्याची शक्यता नाही’

मैनपुरी : समाजवादी पक्षातील एककाळचे शक्तिशाली नेते अमरसिंह सपात पुन्हा परतण्याची शक्यता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी धुडकावून लावली आहे़ अमरसिंह यांच्या पक्षातील पुनर्प्रवेशाच्या मुद्यावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी आज रविवारी स्पष्ट केले़
अलीकडे लखनौमधील एका लोकार्पण कार्यक्रमात सपाप्रमुख मुलायमसिंह आणि अमरसिंह एका व्यासपीठावर दिसले होते़ या कार्य्रकमात मी मुलायमवादी असल्याचे सांगत अमरसिंहांनी सपाप्रमुखांवर स्तुतिसुमने उधळली होती़ यानंतर ते सपात परण्याच्या चर्चेने जोर धरला होता़ रामगोपाल यांना पत्रकारांनी याबाबत छेडले असता, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले़ अमरसिंह सपात परतण्याची कुठलीही शक्यता नाही़ अद्याप पक्षात कुठल्याही स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला गेलेला नाही, असे ते म्हणाले़
अमरसिंग सध्या राज्यसभा सदस्य आहेत़ येत्या नोव्हेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ संपत आहे़

Web Title: There is no possibility of returning to Amar Singh SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.